Hingoli Protest for Train : हिंगोली-मुंबई रेल्वे फेरी सुरू करा, व्यापाऱ्यांचा एल्गार ABP Majha
हिंगोली ते मुंबई आशि रेल्वे फेरी सुरू करावी ही मागणी गेल्या अनेक दिवसापासून होत आहे परंतु प्रशासन याला गांभीर्याने घेत नसल्याने आज अखेर रेल्वे संघर्ष समिती आणि व्यापाऱ्यांच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे नागरिक रेल्वे स्टेशन वर मोर्चा काढून रेल्वे रोखणार आहेत तर सोलापूर मधील होडगीर रोड विमानतळावरून नागरी विमान वाहतूक सेवा सुरू भावी यासाठी गेल्या 17 दिवसापासून चक्री उपोषण सुरू आहे सोलापूर विकास मंचाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू आहे विमानतळाच्या शेजारीच असलेल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी विमानसेवेला अडथळा ठरत आहे विमानसेवेचा हा अडथळा दूर करण्याचे निर्देश DGCA मी दिले होते त्यानुसार प्रशासनाने देखील चिमणी हटवण्याची नोटीस कारखान्याला दिली होती मात्र न्यायालयात गेल्याने अनेक वर्षापासून चिमणीचा अडथळा अद्याप कायम आहे केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे विमान सेवा सुरू होत नसल्याचा आरोप सोलापूर विकास मंचाचा आहे.