Hingoli Haldi Issue : हिंगोलीत हळदीचे दर 5 हजारांवर, शेतकरी-व्यापाऱ्यांमध्ये दरांवरून वाद
Continues below advertisement
हिंगोली मधील हळदीच्या बाजारसमितीत शेतकऱ्यांनी हळदीचा लिलाव थांबवला आहे. व्यापारी मुद्दाम हळदीचे भाव पाडून कमी भावाने हळद खरेदी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संत नामदेव मार्केट यार्ड मध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये काही काळ चांगलीच जुंपली. व्यापारी 5 हजार ते 5 हजार 200 रुपये प्रति क्विंटल इतक्या कमी दराने हळद खरेदी करत आहेत. इतर बाजार पेठेत हळदीचे भाव सात हजार पर्यंत असल्याचं शेतकरी सांगतायत. यात भर म्हणजे शेतकऱ्यांच्या हळदीला प्रति पोते 1700 ग्रॅम इतकी कपात लावली जात असल्यानं शेतकऱ्यांना दुहेरी तोटा सहन करावा लागतोय. त्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी हळदीचा लिलाव बंदा पाडला.
Continues below advertisement