Hingoli Firing : हिंगोली भाजयुमो अध्यक्ष पप्पू चव्हाण गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी अटकेत

Hingoli Firing : हिंगोली भाजयुमो अध्यक्ष पप्पू चव्हाण गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी अटकेत हिंगोली चा जिल्हा परिषद कार्यालयासमोर एक ऑगस्ट रोजी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर दिवसा गोळीबार झाला होता या घटनेच्या निषेधार्थ आज पप्पू चव्हाण यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता पोलीस अधीक्षकांची बदली करावी या घटनेची सीआयडी चौकशी करावी यासह अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आला होता या घटनेमध्ये आरोपीला पैसे आणि पिस्तूल पुरवण्याचे काम शिवसेना आमदार संतोष बांगर राम कदम यांच्यासह त्यांच्या अन्य दोन सहकाऱ्यांनी केल्याचा आरोप पप्पू चव्हाण यांनी केला आहे त्याचबरोबर घटना घडली त्यादिवशी एसपींना मुख्यमंत्र्यांचा फोन कुणासाठी आला होता असा प्रश्न सुद्धा पप्पू चव्हाण यांनी उपस्थित केला आहे मी राजकारणात जास्त सक्रिय होतोय त्यामुळे मला संपवण्यासाठी हा माझ्यावर हल्ला केल्याचा आरोप यावेळी पप्पू चव्हाण यांनी केला होता त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच माध्यमासमोर  आले होते तेव्हा त्यांचे अश्रू अनावर झाले होते 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola