Hingoli : बैलगाडा शर्यत पाहणं आलं अंगलट, आरडा-ओरड्यामुळे बिथरलेली बैलजोडी थेट लोकांच्या घोळक्यात

हिंगोलीत बैलगाडा शर्यत पाहणं लोकांच्या अंगलट आलंय. प्रेक्षकांच्या आरडा-ओरड्यामुळे बैलजोडी बिथरली आणि थेट लोकांच्या घोळक्यातच बैलजोडी घुसली. सेनगावच्या दाताडा बुद्रुक शिवारात ही घटना घडलीय. बैलजोडी वेगाने आल्यामुळे प्रेक्षकांची मोठी तारांबळ उडाली. धावपट्टी सोडून उधळलेली ही बैलजोडी नंतर लांबवरच्या डोंगरात जाऊन थांबली. पण झालेल्या प्रकारामुळे लोकांची चांगलीच पळता भुई थोडी झाली.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola