Hingoli : पाण्यावर तरंगणाऱ्या बाबांची पंचक्रोशीत चर्चा

आतापर्यंत वेगवेगळे चमत्कार करणारे बाबा आपण पाहिलेत.. हिंगोलीत एक बाबा पाण्यावर तरंगतांना दिसतायत... हिंगोली तालुक्यातील धोतरा येथे भागवत सप्ताह सुरू आहे.. भागवताचार्य हरिभाऊ राठोड महाराज हे भागवत करतायेत.. कोणतीही हालचाल न करता पाण्यावर तरंगू शकतो असा दावा त्यांनी केलाय.. याचं प्रात्यक्षिक या बाबांनी गावातील भल्या मोठ्या विहिरीत करून दाखवलंय.. बाबाला पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली. दरम्यान  अनेक जणांचे पाण्यावर योगा करत तरंगतानाचे व्हिडीओ आहेत... त्यामुळे बाबाच्या दावावरच सवाल उपस्थित होतोय... 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola