Hingoli Gram : हिंगोली जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत, हरभरा 4,100 रुपयांनी विकण्याची वेळ
हिंगोली जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अद्यापही हरभरा खरेदीसाठी नाफेडच्या केंद्रांवर हमीभावासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली नाहीय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. खरंतर, दरवर्षी हिंगोलीत हरभरा खरेदीसाठी नाफेडच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले जातात. पण अद्याप त्याबाबत हालचाल झालेली नाहीय. दरम्यान, अनेक ठिकाणी हरभरा काढणी सुरू झालीय. यंदा हरभऱ्याला प्रतिक्विंटल पाच हजार ३०० रुपयांचा दर जाहीर झालाय. मात्र काढणी केलेला हरभरा आता चार हजार १०० रुपयांनी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय.
Tags :
Farmer Hingoli Gram Purchase In Trouble NAFED Gram Producer Registration Process Farmer Havaldil Rate Of Rs.300