Gajanan Maharaj Palkhi Hingoli : वाढोणामध्ये श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत
Continues below advertisement
हिंगोली जिल्ह्यातील वाढोणामध्ये श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलंय. गण गण गणात बोते आणि विठ्ठल नामाच्या गजर करत गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल झालीय. गजानन महाराजांच्या पालखीचं हे 54 वं वर्ष आहे. साडेसातशे वारकरी ५५० किलोमीटरचा पायी प्रवास एका महिन्यात पूर्ण करून आषाढी एकादशीला पंढरीत पोहोचतात. पांढरीशुभ्र कपडे, हातात भगवा झेंडा आणि शिस्तीत चालणारे वारकरी हे या वारीचे वेगळेपण असतं.
Continues below advertisement
Tags :
Vitthal Palkhi Hingoli Swagat 'Marathwada Gadhona Sri Sant Gajanan Maharaj Gan Gan Ganat Bote