Farmers son letter to CM : दिवाळी तरी गोड करा, शेतकऱ्याच्या सहावीतील मुलाचं मुख्यमंत्र्यांना पत्र
शेतातील नुकसानीचा परिणाम शेतकऱ्यांच्या मुलांच्या वयक्तिक आयुष्यावर होतोय तर सण उत्सव सुद्धा आर्थिक अडचणीमुळे साजरे करता येत नाहीत या वर्षी सुद्धा शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीची भरपाई दिवाळी आगोदर मिळावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना एका चिमुकल्याने पत्र लिहित केली आहे. हिंगोलीतील गोरेगाव येथील सहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थी प्रताप कावरखे याने पात्रात लिहिले आहे. या वर्षी शेतातील सोयाबीन पिकाचे पूर्ण नुकसान झाले आहे. त्यामुळे खर्चायाला सुद्धा पैसे मिळत नाहीत दसऱ्याला आईने पुरणपोळ्या केल्या नाही इथे विष खायला पैसे नाहीत तर पुरणपोळी कुठे करणार असे आई म्हणत आहे बँकेचे अनुदान आले की दिवाळीला पुरणपोळी करू असे आई म्हणत आहे. गावाजवळील एका गावात शेतकऱ्याच्या मुलाने वडिलाला खाऊ साठी पैसे मागितले तर त्याच्या वडिलांनी फाशी घेतली म्हणून मी बाबाला पैसे नाही मागत. परंतु मुख्यमंत्री साहेब आमच्या घरी पाहा की तुम्ही या अनुदानाचे पैसे लवकर द्या, मग आई दिवाळीला पोळ्या करते तुम्ही या पोळ्या खायला, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.