Mahashivratri 2023 : औंढ्यात नागनाथाच्या दर्शनासाठी गर्दी, आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते महापूजा
बारा ज्योतिर्लिंगापैकी आठव्या स्थानी असलेल्या श्रीक्षेञ औंढा नागनाथ येथील महाशिवरात्रीच्या यात्रा या महोत्सवाला सुरुवात झाली. शनिवारी रात्री साडेबारा वाजता देवस्थानाचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार डाँ कृष्णा कानगुले ,कळमनुरी विधानसभा शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते रीतसर अभिषेक करून महापूजा झाली. रात्री दोन वाजता भाविकांना दर्शनासाठी मंदीर खुले करण्यात आले. रात्री पासुनच हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.मध्यरात्रीपासून नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता.