Hingoli : शिवरायांच्या जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम, फ्लेक्समधून सांगितली महाराजांची शौर्य गाथा
abp majha web team
Updated at:
19 Feb 2024 02:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण सगळीकडे बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात पाहत असतो त्या बॅनरवर राजकीय नेते आणि पुढाऱ्यांचे मोठे फोटो असलेले बॅनर लावण्यात येतात हिंगोलीत मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची माहिती देणारे फ्लेक्स लावण्यात आले आहेत शिवाजी महाराजांच्या जीवन काळातील महत्त्वाचे बदल महत्त्वाच्या घडामोडी ची माहिती देणारे फ्लेक्स शहरात लावण्यात आले आहेत दहा बाय वीस लांबी रुंदी असलेले एकूण 40 फ्लेक्स हिंगोली शहरातील शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये लावण्यात आले आहेत या फ्लेक्स च्या माध्यमातून युवा पिढीला शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल माहिती मिळावी या उद्देशाने हे फ्लेक्स लावण्यात आले आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी