Hijab controversy :कर्नाटकमधल्या हिजाब वादाचे महाराष्ट्रात पडसाद, मालेगावमध्ये एकवटल्या हजारो महिला

शिक्षणसंस्थांमध्ये धार्मिक पोशाख नको, अशी सूचना कर्नाटक उच्च न्यायालयानं केली असली तरी हिजाब प्रकरणाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. मालेगावमध्ये आज हिजाब दिन पाळण्यात येणार आहे. त्याआधी काल मालेगावातल्या मैदानात हजारो महिलांनी एकत्र येऊन हिजाबचं समर्थन केलं. या मेळाव्यात मौलानांनी महिलांना मार्गदर्शन केलं. आज हिजाब दिनानिमित्त हिजाब परिधान करूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय या महिलांनी जाहीर केलाय. दुसरीकडे जालन्यातही काल मुस्लिम महिलांनी हिजाबच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. या मोर्चात शेकडो मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola