आषाढी वारी! हेलिकॉप्टर किंवा वाहनानं पादुका पंढरीला नेणार, वारकरी आणि अजित पवारांच्या बैठकीत निर्णय
कोरोनाच्या संकटामुळे यंदा आषाढीची पायी दिंडी रद्द करण्यात आली. दशमीच्या दिवशी आळंदी आणि देहूमधून माऊली आणि तुकोबांच्या पादुका पंढरीला नेल्या जाणार आहेत. या पादुका हेलिकॉप्टर किंवा वाहनांनं नेल्या जाण्याची शक्यता आहे.