Pandharpur Flood | पंढरपूर, सांगोला, माळशिरसमध्ये पावसाचा कहर, द्राक्ष, डाळिंबाच्या बागा उध्वस्त

Continues below advertisement

काल सायंकाळी पंढरपूर तालुक्यासह सांगोला व माळशिरस तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पळशी  , सुपली , गार्डी या गावांचा संपर्क तुटला असून फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.  खर्डी परिसरात ढगफुटीसारखा तुफान पावसाने दणका दिल्याने फळबागांच्या शेतीला ओढे नाल्याचे स्वरूप आले होते.  खर्डी जवळील गगनगिरी भगत सर्वात जास्त पावसाचा कहर दिसून आला असून शेतातून पाण्याचे लोंढे वाहत असल्याचे चित्र दिसत होते. या पावसाने डाळिंब व द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी कासेगाव परिसरालाही पावसाने मोठा दणका दिला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram