Health Minister on #Corona | राज्यात 52 कोरोनाबाधित, पाच जण डिस्चार्जच्या मार्गावर : राजेश टोपे
Continues below advertisement
राज्यातील कोरोनाबाधितांमध्ये आज आणखी तीन जणांची भर पडली आहे. राज्यात सध्या 52 कोरोनाबाधित असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तीन नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील कोरोनासंदर्भातील सद्यपरिस्थितीची माहिती दिली. दिलासादायक बाब म्हणजे या 52 पैकी पाच जण डिस्चार्ज मिळण्याच्या मार्गावर असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
What Is Corona Corona Virus Care Corona Virus Meaning China Rajesh Tope Health Minister Corona Virus