#ABPKoMatRoko | ABP Newsचा हाथरसमध्ये सत्याग्रह, एबीपीच्या प्रतिनिधींसोबत पोलिसांचं गैरवर्तन

Continues below advertisement

उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. देशभरात या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी देशभर आंदोलन केली जात आहेत. माध्यमांना या गावात जाण्यासाठी प्रशासनाकडून बंदी घालण्यात येत आहे. या प्रशासनाच्या भूमिकेच्या विरोधात एबीपी न्यूजच्या रिपोर्टर प्रतिमा मिश्रा यांनी तिथंच ठिय्या आंदोलन सुरु केलंय. सध्या #ABPKoMatRoko हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. एबीपी न्यूजच्या रिपोर्टर प्रतिमा मिश्राला रिपोर्टिंग करण्यापासून रोखलं गेलं. तिने तिथेच ठिय्या दिला आहे.

 एबीपी न्यूज हाथरसमध्ये सातत्यानं रिपोर्टिंग करत आहे. मात्र पीडितेच्या परिवाराशी संपर्क करु दिला जात नाही. तसंच माध्यमांना गावात जाण्यापासून रोखलं जात आहे. तिथं वार्तांकन करणाऱ्या एबीपीच्या रिपोर्टर प्रतिमा मिश्रा यांना रोखण्यात आलं तसंच कॅमेरापर्सनला देखील पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram