Diwali 2022 : 'एबीपी माझा'कडून दिवाळीच्या प्रेक्षकांना शुभेच्छा, आली चैतन्यांची दिवाळी : ABP Majha
Continues below advertisement
प्रकाशाचं पर्व, तेजाचा उत्सव आणि मांगल्याचे पूजन अर्थात दीपावली.... सणांचा राजा असलेला दिवाळी सण प्रत्येकाच्या मनात चैतन्य, उत्साह आणि प्रकाश घेऊन येतो... दिव्यांची आरास आणि कंदिलाच्या प्रकाशाने अंगण उजळून निघालंय.. फराळाच्या ताटाचा दरवळ सुटलाय... त्यातच कोरोनाच्या दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होतेय.. त्यामुळे यंदा दिवाळीचा उत्साह द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळतोय... कपडे, फटाके, मिठाई खरेदीसाठी झुंबड उडालीय.. दिवाळीचा मुहूर्त साधत सोने, वाहन आणि घर खरेदी करण्यात येते... एकीकडे हा उत्साह असला तरी महाराष्ट्राच्या काही भागात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.. त्यामुळे दिवाळीत या शेतकऱ्यांचीही आठवण ठेवूया.... या शेतकऱ्यांना जमेल तशी मदत करत आपण सारे माणुसकीची दिवाळी साजरी करुया हेच आवाहन एबीपी माझा करतंय...
Continues below advertisement