Varsha Raut ED Notice | बाकी काही होऊ शकत नाही म्हणून ईडीचं ब्रह्मास्त्र, गुलाबराव पाटलांची टीका
मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस धाडली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या नोटीसनुसार 29 तारखेला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे. मात्र केंद्र सरकारकडून सुडाचं राजकारण होत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून केला जात आहे.