Gujrat मध्ये Pm Narendra Modi यांच्या हस्ते प्रकल्पाच्या कोनशिलेचं उद्घाटन : ABP Majha

वेदांता फॉक्सकॉननंतर महाराष्ट्रात येऊ घातलेला आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. हा प्रकल्प तब्बल २२ हजार कोटींचा होता सी-२९५ या लष्करी वाहतुकीसाठीच्या विमाननिर्मितीचा प्रकल्प नियोजित नागपूरऐवजी गुजरातमधल्या बडोद्यात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० ऑक्टोबरला या प्रकल्पाच्या प्लान्टच्या कोनशिलेचं उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा प्रकल्प नागपुरात होणार असल्याची माहिती एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर दिली होती. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर झालेल्या माझा कट्टा कार्यक्रमात बोलताना त्यांनी एअरबस प्रकल्पाबाबत केंद्रासोबत पाठपुरावा सुरु असल्याची ग्वाही दिली होती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola