Gujrat मध्ये पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 200 कोटी रुपयांचे 40 कोटी ड्रग्ज : ABP Majha
भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने अमली पदार्थांची खेप देशात पाठवण्याचा विदेशी कट उधळून लावलाय. कोस्ट गार्ड आणि गुजरात एटीएसने संयुक्त कारवाईत गुजरात किनारपट्टीवर २०० कोटी रुपयांचे ४० किलो ड्रग्ज घेऊन जाणारी पाकिस्तानी बोट पकडली असून सहा पाकिस्तानी नागरिकांनाही अटक केलीय. तटरक्षक दलाची पाळत सुरु असताना, गुजरातमधील जखाऊ बीचपासून ३३ नॉटिकल मैल अंतरावर एक संशयास्पद बोट दिसली, सतर्कतेने तटरक्षक दलाच्या दोन जलद हल्ला बोटींनी ही बोट पकडली. या पाकिस्तानी बोटीसह चालक दलाला पुढील तपासासाठी जखाऊ येथे आणण्यात आलंय.