Government Employees Dresscode | सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन पेहरावासाठी मार्गदर्शक सूचना
Continues below advertisement
मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांनाही ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश सरकारने जाहीर केले आहे.
मंत्रालयातून राज्य सरकारचा कारभार चालविण्यात येतो. लोकप्रतिनीधी, सर्वसामान्य नागरिक, अधिकारी हे त्यांच्या कामासाठी कार्यालयाला भेट देतात. अशा वेळी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून सरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्माचारी यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग आहे. तसेच कार्यालयीन वेळेत उपस्थित असताना सरकारी कर्मचारी अनुरुप ठरेल अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन होते.
Continues below advertisement