4 Tigers Hunting Deer | चार वाघ मिळून एका हरणाची शिकार करतात तेव्हा... | ABP Majha
साधारणपणे वाघ एकट्याने तर सिंह समुहात शिकार करतात. मात्र, नागपूरजवळच्या पेंच राष्ट्रीय उद्यानात वाघांच्या स्वभावाचा वेगळा पैलू आला समोर आहे. पेंचमधील तुरिया गेटजवळच्या परिसरात चार वाघांनी मिळून एका हरणाची शिकार केली आहे. एकाने हरणाचा पाठलाग केला तर इतरांनी घात लावून सोबत केली.