शेतकरी आंदोलनामुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक संकटात, आंदोलनामुळे द्राक्ष निर्यातदार दिल्लीत अडकले
कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनाचा फटका सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसतो आहे. सांगली जिल्ह्यातुन दिल्लीत मोठया संख्येने द्राक्ष विक्री होते. तसेच दिल्लीरील व्यापाऱ्यांकडून पुढे पंजाब, उत्तराखंड, नेपाळ या ठिकाणी द्राक्ष निर्यात होतात मात्र यंदा ही निर्यात पूर्णतः मंदावली आहे.