Sarpach Election | सरपंच थेट जनतेतूनच हवा, 9 हजारहून अधिक ग्रामपंचायतींचा ठराव | ABP MAJHA
फडणवीस सरकारनं थेट जनतेतून सरपंच निवडण्यासंदर्भात केलेला कायदा ठाकरे सरकारनं रद्द केला. मात्र सरपंचाची निवडणूक थेट जनतेतूनच व्हावी असा ठराव मंजूर करत हजारो ग्रामपंचायतींनी ठाकरे सरकारला धक्का दिला आहे. जवळपास 9 हजारहून अधिक ग्रामपंचायतींनी तसा ठराव मांडल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिली आहे. यामुळे सरकार आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Tags :
Rural Development Minister Hasan Mushrif Sarpanch Hasan Mushrif Fadnavis Government Grampanchayat Election Maharashtra Vikas Aghadi Thackeray Government Devendra Fadnavis Maha Vikas Aghadi