Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याची धडपड, निधीचं अमिष कितपत योग्य?
मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. राज्यातील 14 हजारांहून अधिक गावांच्या आखाड्यात निवडणुकीचा जंगी सामना सुरु झालाय. दरम्यान ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावताना दिसत आहेत. गावच्या ग्रामपंचायती बिनविरोध करा मग लाखोंचा निधी देऊ अशा फर्मास ऑफर्स आमदार आणि लोकप्रतिनिधी देऊ लागलेत. बरं त्यांच्या या आवाहनाला बऱ्यापैकी पाठिंबा देखील मिळत आहे. महाराष्ट्रातील जवळपास 12 आमदारांनी ग्रामपंचायत बिनविरोध करा आणि लाखोंचा निधी घ्या, अशा घोषणा केल्यात. मात्र हा निधी आमदार मंडळी स्वत:च्या खिशातून देणार का? असा सवाल केला जात आहे. कारण या आवाहनाला जोरदार प्रतिसाद मिळाला तर आमदार निधी निश्चितच पुरणार नाही.
Tags :
Grampanchyat Election 2021 Gram Panchayat Elections BJP Maha Vikas Aghadi Shiv Sena Ncp Maharashtra Congress