37 साखर कारखान्यांना राज्य सरकारची थकहमी, संकटात सापडलेल्या कारखान्यांना दिलासा
उस्मानाबाद : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने एक नाही दोन नाही तब्बल 37 साखर कारखान्यांना राज्य सरकारची थकहमी दिली आहे. ती देताना हे सरकार सत्तेवर आले तेव्हा या कर्जाला कारखाना संचालक वैयक्तिक जबादार असतील असा निर्णय घेतला होता. तो निर्णय काल बदलण्यात आला. आता कारखाना संचालक सामुहिक जबाबदार असतील. वैयक्तिक संपत्ती द्यायची गरज नाही. यापुर्वीच्या निर्णयानुसार साखर संचालक आणि सहकार आयुक्त कोणत्या कारखान्यांना थकहमी द्यायची याची शिफारस करणार होते. मात्र या 37 कारखान्यांबाबत असा अभ्यास झाल्याची माहिती नाही.