Gondia: तापमान घटलं,राजकारण तापलं,प्रचारासाठी शेकोट्यांचा आधार शेकोट्यांच्या ठिकाणी जाऊन प्रचार

Continues below advertisement

एकीकडे राज्यात गारठा वाढतोय, तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात निवडणुकीचं वातावरण तापलंय. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारही आता शेकोट्यांचा आधार घेताहेत. विदर्भात गोंदिया जिल्ह्याचं तापमान सर्वात खाली घसरलंय. अगदी तापमानाचा पारा ११.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. उद्या म्हणजे २१ डिसेंबरला १०६ नगरपंचायती, भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत १५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रचार करताना उमेदवारांना आता भरथंडीत ऊबदार कपडे घालून नागरिकांच्या शेकोट्याच्या ठिकाणी जावं लागतंय

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram