Gondia : गोंदियात निद्रावस्थेतील हनुमानाची स्वयंभू मूर्ती
Gondia : गोंदियात निद्रावस्थेतील हनुमानाची स्वयंभू मूर्ती गोंदिया शहरातील गौतम नगर परिसरामध्ये हनुमानाची निद्रावस्थेतील प्राचीन स्वयंभू मूर्ती आहे. आज हनुमान जयंतीनिमित्ताने कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मोठ्या संख्येने हनुमान भक्त दर्शनासाठी पोहोचले आहेत. या मंदिरातील मूर्ती सुमारे ३०० वर्षे जुनी असल्याचं इथले नागरिक सांगतात. तर ही मूर्ती दगडावर कोरलेली आहे.