Gondia Farmer : धानाचे चुकारे रखडल्याने शेतकऱ्यांचं आंदोलन, आमदारांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या
Continues below advertisement
गोंदिया जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील शेकडो धान उत्पादक शेतकऱ्यांचे चुकारे थकले आहेत. त्यामुळं संतप्त शेतकऱ्यांनी अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयसमोर काल दुपारपासून ठिय्या आंदोलन सुरू केलंय. रात्रीही शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं नाही. आमदार विनोद अग्रवाल आणि शासनाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोपर्यंत हातात पैसे मिळणार नाही. तोपर्यंत इथून उठणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलीय.. जिल्हा पणन कार्यालयाच्यावतीने गेल्या तीन महिन्यांपासून आश्वासनं देण्यात येतायत, चुकारे मात्र मिळत नाहीयेत, अशी तक्रार शेतकरी करतायेत.
Continues below advertisement