Goa : पर्यटन राज्य गोव्यात रात्रीची संचारबंदी लागू नाही - मुख्यमंत्री प्रमोद सावंत : ABP Majha

नाताळच्या सुट्ट्यांमध्ये अनेकांचं ठरलेलं डेस्टिनेशन म्हणजे गोवा यंदा ओमायक्रॉनमुळे अनेक राज्य निर्बंधांच्या साखळीत अडकत असताना गोव्यात मात्र कठोर निर्बंध नसल्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय... गोवा हे राज्य पर्यटनावर अवलंबून आहे. यामुळे गोव्यात रात्रीची संचारबंदी लागू नाही अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेय. पण कोरोनाचा सामना करण्यासाठी  प्रशासन पुर्णपणे सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं. नियमांचं पालन होतंय अथवा नाही यावर काटेकोरपणे लक्ष ठेवलं जाईल असं सावंत यांनीनी सांिगतलंय. तसंच ओमयाक्रॉनचा संसर्ग होणार नाही यासाठीही यंत्रणा सज्ज असल्याचं ते म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola