Girls Birth Rate Dawn in Pune | पुण्यात मुलींचा जन्मदर घसरला
पुणे : संपूर्ण देशात महाराष्ट्र या राज्याची पुरोगामी राज्य म्हणून ओळख असताना काही बाबी मात्र चिंता वाढवणाऱ्या आहेत. एकीकडे हिंगणघाट सारखी घटना जिथे प्राध्यापिकेला भर रस्त्यात जाळून टाकण्यात आले. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातच पुण्या सारख्या जिल्ह्यात ज्याला विद्याचे माहेरघर म्हणून ओळखले जाते त्या शहरात मुलींचा जन्मदर घटत आहे.