CDS Bipin Rawat Death : जनरल रावत यांचं पार्थिव दिल्लीला नेणार ABP MAJHA

Continues below advertisement

हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालेल्या सीडीएस जनरल बिपीन रावत यांचं पार्थिव संध्याकाळी राजधानी दिल्लीत आणण्यात येणारे. त्याआधी रावत यांचं पार्थिव कुन्नूरमधील वेलिंग्टनच्या महाविद्यालयात ठेवण्यात आलंय. इथे लष्कराकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. काल तामिळनाडूतल्या कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर कोसळून जनरल बिपीन रावत यांच्यासह १३ जणांचं निधन झालं. तरी, आज रावत यांच्यासह १३ जणांचे पार्थिव दिल्लीत आणले जातील. उद्या सकाळी लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. दरम्यान, एअरचीफ मार्शल विवेकराम चौधरी यांनी दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती लोकसभेत दिली. त्यानंतर अपघातात बचावलेल्या ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्यावर वेलिंग्टनच्या रुग्णालयात उपचार घेत असून त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram