Gadchiroli Iron Ore : गडचिरोली लोहखनिज प्रकल्पाच्या अनुमतीसाठी जनसुनावणी : ABP Majha

आता बातमी आहे गडचिरोलीतून... नक्षलग्रस्त गडचिरोलीच्या जिल्ह्यातील  कोरची तालुक्यातील झेंडेपार इथे 46 हेक्टरमध्ये लोहखनिज प्रकल्प सुरु होतोय. या प्रकल्पाच्या पर्यावरण परवानगीसाठी शासनाने आज गडचिरोलीत जनसुनावणी ठेवलीये. हा प्रकल्प 46 हेक्टरमध्ये म्हणजे अगदी छोटा असून यामध्ये एकही गाव विस्थापित होणार नाहीये. तर सोबतच या प्रकल्पात स्थानिकांनाच रोजगार देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे या प्रकल्पाचा स्थानिकांना फायदा होणार असल्याचं प्रकल्प संचालकांकडून सांगण्यात येतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola