Gadchiroli : तेलंगणातील पुराचा गडचिरोली जिल्ह्याला फटका, सिंरोचामध्ये गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ
तेलंगणा राज्यात ढगफुटी सारख 600 mm इतका पाऊस पडला आहे. त्यामुळे महाराष्ट्रच्या सीमेवर असलेल्या भूपालपल्ली जिल्ह्यात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हजारो घेरं पाण्याखाली गेली आहेत. तेलंगाणा राज्यातील कडेम आणि श्रीपदा एल्लमपल्ली धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला आहे. त्याचा फटका हा थेट गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याला बसणार आहे. सिरोंचा तालुक्याच्या सीमेवर गोदावरी नदी आहे. आणि या पुराचं पाणी आता गोदावरीला येऊन मिळणार आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात जिल्हाधिकारी संजय मीना यांनी संपूर्ण यंत्रणा सज्ज केली आहे. वॉर रूममधून प्रशासन याकडे लक्ष ठेवून आहे. काल मध्यरात्रीच्या दरम्यान गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. सिरोंचा तालुक्यातील असरल्ली मध्ये 164.8 मिमी इतका पाऊस पडला तालुक्यातील 4 गावांतील 330 लोकांना सुरक्षित स्थळी हवण्यात आले आहे