Gadchiroli Naxal : नक्षलवाद्यांचा हमासला पाठिंबा; गडचिरोलीत सनर्थनाचे बॅनर्स
abp majha web team
Updated at:
30 Nov 2023 02:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGadchiroli Naxal : नक्षलवाद्यांचा हमासला पाठिंबा; गडचिरोलीत सनर्थनाचे बॅनर्स छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी हमास या दहशवादी संघटनेला पाठिंबा दिला आहे. हमास दहशतवादी संघटना नाही तर क्रांतिकारी संघटना असल्याचं त्यांनी म्हटलंय. पीपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मी म्हणजेच पीएलजीए स्थापनेला २३ वर्ष झाल्याच्या निमित्ताने दोन ते आठ डिसेंबर दरम्यान नक्षलवादी पीएलजीए आठवडा साजरा करणार आहेत. ((या काळात विशेष कार्यक्रम आयोजित करा असा संदेश असलेले बॅनर्समध्ये नक्षलग्रस्त भागात लावले असून त्यात उघडपणे हमासला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर कार्यरत हमाससारख्या अत्यंत क्रूर आणि घातक दहशतवादी संघटनांसोबतही नक्षलवाद्यांचा संपर्क स्थापित होत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.))