Gadchiroli जिल्ह्यातील होड्री गावात पुलाच्या रॅम्पसाठी आंदोलन, गावकऱ्यांची दोन वर्षांपासून कसरत
"येत्या दोन वर्षात देशातून नक्षलवाद संपवू" असा दावा देशाचे गृहमंत्री अमित शाह केला. मात्र गेली दोन वर्ष गडचिरोली जिल्ह्यात एका पुलाच्या दोन्ही बाजूला काँक्रिटचे रॅम्प बांधण्यात सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळेच मुंबईतून निघालेला गतिमान सरकारचा दावा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरच्या होड्री गावात पोहोचेपर्यंत फोल ठरताना दिसत आहे.