CM Eknath Shinde Gadchiroli : मुख्यमंत्री शिंदे भामरागडमध्ये दाखल, नक्षलींच्या गडात सेलिब्रेशन
पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. यंदाही मोदींनी कारगिलमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली. आता पंतप्रधान मोदींप्रमाणेच मुख्यमंत्री शिंदे नक्षलग्रस्त भागात दिवाळी साजरी करणार आहेत. नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यातील दोडराज पोलीस केंद्रात पोलीस आणि जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. दोडराज पोलीस मदत केंद्र हे छत्तीसगडला जाणाऱ्या भामरागड-लाहेरी मार्गावर आहे. या संपूर्ण भागात कायम नक्षलवाद्यांच्या घडामोडी घडत असतात. काही वर्षांपूर्वी या पोलीस केंद्रापासून अवघ्या काही अंतरावर नक्षल्यांनी भुसुरुंग स्फोट घडवून पोलिसांचं वाहन उडवलं होतं. यांत अनेक पोलीस शहीद झाले होते.. याच भागात मुख्यमंत्री दिवाळी साजरी करणार आहेत. एकनाथ शिंदेंकडे गेले काही वर्ष गडचिरोलीचं पालकमंत्रीपद होतं. आता उपमुख्यमंत्री फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. मात्र शिंदेंनी गडचिरोलीशी संपर्क कायम ठेवलाय. काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे गडचिरोलीत पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीचा पाहणी दौरा केला होता.