Free #CoronaTest उद्यापासून मुंबईत 244 ठिकाणी मोफत कोरोना चाचणी होणार,लक्षणं आढळल्यास हेल्पलाईवर संपर्क साधा
केंद्र शासनाने कोरोना लसीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याचे समन्वय साधण्यासाठी राज्यांनी एक समिती तयार करावी असे निर्देश दिले आहेत. तसेच या दरम्यान सोशल मीडियावरही लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत जेणेकरुन लसीकरणाबाबत कोणत्याही अफवा पसरु नयेत आणि लसीकरणाचा कार्यक्रम सुलभपणे पार पडावा. कोरोनाच्या लसीचे वितरण येत्या वर्षभरात होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या लसीचे वितरण हे आरोग्य कर्मचाऱ्यांपासून करण्यात येणार आहे आणि त्यानंतर इतर गटांना त्यात सामावून घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारने राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत एक पत्र लिहून तशा प्रकारचे निर्देश दिले आहेत.
Tags :
Free Test Free Corona Test Corona Negative Corona Patient Vidhan Bhavan Corona Positive Mumbai Corona Corona Test