PM Gareeb Kalyan Yojana| पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत नोव्हेंबरपर्यंत गरजूंना मोफत धान्य

Continues below advertisement

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांशी आज संवाद साधला. देशात अनलॉक-2 लागू झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पावसाळा आला असल्याने स्वतःची काळजी घेण्याचं आवाहनही पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केलं आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं पालन नागरिकांनी योग्य पद्धतीने केल्याने भारतात करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहिला. राज्य सरकार, देशातील नागरिक आणि संस्थांनी अशाच प्रकारची सतर्कता बाळगणं गरजेचं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करणे आवश्यक आहे. नियमांचं पालन करणाऱ्यांना समजावलं पाहिजे. अनलॉक-1 मध्ये काही प्रमाणात निष्काळजीपणा वाढताना दिलसा आहे, ही बाब चिंताजनक आहे. देशाचा पंतप्रधान असो किंवा सामान्य नागरिक सर्वांना नियम एकसारखे आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram