Thane Antigen Test | ठाण्यात घरकाम करणाऱ्या महिला आणि नाका कामगारांच्या मोफत अॅंटिजन टेस्ट - एकनाथ शिंदे
Continues below advertisement
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता ठाण्यात मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत असल्याचं राज्याचे नगर विकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. ठाणे महानगरपालिकेत प्रत्येक क्षेत्रात आता घरकाम करणाऱ्या महिला आणि प्लंबर, सफाई कामगार किंवा इतरही जे नाका कामगार आहेत या सर्वांच्या मोफत अंटिजन टेस्ट केल्या जाणार आहेत. याबाबत एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली.
Continues below advertisement