#CycloneNisarga चक्रीवादळामुळे चार जण जखमी, मात्र कोणतीही जीवितहानी नाही, उदय सामंत यांची माहिती
Continues below advertisement
रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. यात 4 जण जखमी झाले आहेत. मात्र जिवितहानी नाही. तसेच वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून नुकसानाबाबत 2 दिवसांत भरपाई रक्कम शासकीय नियमांप्रमाणे दिली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. हे चक्रीवादळ जिल्ह्यातून पुढे सरकले असून पाऊस थांबताच नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
Continues below advertisement
Tags :
Cyclone Maharashtra Nisarga Cyclone Update Cyclone Updates Nisarga Cyclone Information Cyclone Nisarga Nisarga Cyclone