Nirmala Sitharaman | संरक्षण उत्पादन क्षेत्रातील एफडीआय मर्यादा 49 टक्क्यांवरून 74 टक्के -अर्थमंत्री निर्मला सीतारमण

Continues below advertisement
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेजच्या संदर्भात आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सलग चौथ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. सरंक्षण क्षेत्राबाबत महत्त्वाच्या घोषणा आज करण्यात आल्या. सरंक्षण क्षेत्र 'आत्मनिर्भर' करण्यावर भर देण्यात आला. संरक्षण क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. संरक्षण उत्पादनातील एफडीआय मर्यादा 49 टक्क्यांवरून 74 टक्के करण्यात आली आहे, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली. आयुध निर्माण कारखान्यांचं खासगीकरण होणार नाही, तर आयुध निर्माण कारखाने कॉर्पोरेटायझेशन होणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram