Pansare Murder | कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला पाच वर्ष पूर्ण, पानसरेंचे आरोपी अद्यापही मोकाटच
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत, मात्र आजही पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी मोकाट आहेत. कोल्हापुरात आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. तसंच मॉर्निंग वॉकचंही आयोजन करण्यात आलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत सनातन संस्थेचा विरेंद्रसिंह तावडे, समीर गायकवाड यांना अटक करण्यात आली होती. पण पोलिसांच्या हाती अजूनही ठोस काही लागलेलं नाही. पानसरेंच्या हत्येला आज पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतही या प्रकरणातील आरोपी मोकाट आहेत. 16 फेब्रुवारी 2015 ला पानसरे यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती आणि उपचारादरम्यान 20 फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला होता.