Tadoba Tiger | ताडोबाची सफर करताना पाच वाघांचं दर्शन, चार बछड्यांसह वाघिणीचा फेरफटका

चंद्रपूरचा ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी १ ऑक्टोम्बर पासून सुरू करण्यात आलाय. विशेष म्हणजे पर्यटकांना व्याघ्र दर्शन व्हायला देखील सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे ताडोबात सध्या पावसाळा संपल्या मुळे सगळीकडे दाट झाडं आणि हिरवळ आहे. असं असतांना देखील व्याघ्र दर्शन होत असल्याने पर्यटक जाम खुश आहेत. पुण्यावरून आलेल्या काही पर्यटकांना आज सकाळी अगदी रस्त्यावरच रुबाबदार वाघाचे दर्शन झाले. वाघाने मनसोक्त दर्शन दिल्याने 6 महिन्यांचा कोरोना काळ ही पर्यटक क्षणभरासाठी विसरून गेले असतील, यात दुमत नाही. कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून ताडोबात पर्यटकांचा पत्ता नव्हता. कदाचित प्रकल्प सुरू झाल्याने आता वाघांनाही मोठ्या कालावधीनंतर माणसांचे दर्शन झाल्याचा आनंद मिळाला असेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola