BMC Commissioner | मुंबईत लक्ष्मीपूजन वगळता इतर दिवशी फटाक्यांना बंदी, BMC आयुक्तांची माहिती

प्रकाशाचा आणि आनंदाचा सण’ अशी ओळख असणारी ‘दीपावली’ आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.  ‘कोविड – 19’ च्या पार्श्वभूमीवर साजऱया होणाऱया यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी ‘कोविड’ विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाद्वारे सातत्याने व अहोरात्र पद्धतीने करण्यात आलेल्या सर्वस्तरीय प्रयत्नांमुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे सध्या ‘कोविड’ नियंत्रणात येत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसत असले, तरीही ‘कोविड’ची संसर्गजन्यता अधिक असल्यामुळे आपण सर्वांनीच अधिकाधिक काळजी काटेकोरपणे घेणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी शारीरिक दुरीकरण कटाक्षाने पाळणे, सार्वजनिक ठिकाणी वावरताना आवर्जून मास्क परिधान करणे आणि वारंवार साबणाने सुयोग्यप्रकारे हात धुणे या बाबींचा अवलंब करावयाचा आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola