#Tandav वेब सीरिजविरोधात राम कदम यांच्याकडून FIR दाखल, FIR मध्ये सैफ अली खानचं नाव
तांडव...या वेबसीरीजच्या नावाला साजेल असाच धुमाकूळ या सीरीजवरुन सुरु आहे. 9 एपिसोडच्या या सीरीजमध्ये चाळीस सेकंदांच्या एका सीनवरुन हिंदू-देव देवतांचा अपमान झाल्याचा आक्षेप सुरु झाला आणि नंतर हे प्रकरण माफीपर्यंत पोहोचलं. उत्तर प्रदेशात तर या सीरीजच्या निर्मात्यांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. या सीरीजवर आक्षेप घेणाऱ्यांमध्ये भाजपचेच लोकप्रतिनिधी ठिकठिकाणी दिसत होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या आक्षेपांची दखल घेत ओटीटी प्लॅटफॉर्मला नोटीस बजावली आणि त्यांनी हे माफीपत्र जाहीर केलं.
Tags :
Ali Abbas Zafar Unconditional Apology Tandav Controversy News Tandav Controversy ALI ABBAS ZAFAR Tandav Web Series Saif Ali Khan