CBI Investigation Day 1 | पहिल्याच दिवशी CBIचा तपासाचा धडाका, आज कोणत्या गोष्टींचा उलगडा झाला?
Continues below advertisement
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर सीबीआयने आपल्या तपासाला सुरुवात केली आहे. सीबीआयची 16 सदस्यांची टीम या प्रकरणाच्या तपासात गुंतली आहे. मुंबई पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासाची सर्व कागदपत्रे सीबीआयला सोपवली आहेत. याशिवाय सुशांतचा लॅपटॉप, मोबाईल आणि डायरीही सीबीआयने ताब्यात घेतली आहे. दरम्यान 14जूनला सुशांतच्या घरी गेलेल्या पोलिसांचीही चौकशी CBI कडून केली जात आहे.
Continues below advertisement