Finance Minister Niramala Sitharaman | रेशन कार्ड नसणाऱ्यांना 5 किलो धान्य मिळणार - निर्मला सीतारमण
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आपल्या दुसर्या पत्रकार परिषदेत स्थलांतरित कामगार, पथ विक्रेते, छोटे व्यापारी आणि छोटे शेतकरी याबद्दल घोषणा केली आहे. 31 मे पर्यंत शेतकऱ्यांना व्याजातून सूट देण्यात येणार आहे. तसेच परप्रांतीय कामगारांना पुढील दोन महिने मोफत धान्य मिळणार असून. कार्ड नसलेल्यांना पाच किलो रेशन देण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.
निर्मला सीतारमण म्हणाल्या की, कामगारांचे कल्याण हे आमच्या अजेंड्यात अव्वल आहे. किमान वेतन सध्या केवळ 30 टक्के कामगारांना लागू आहे. आम्हाला ते प्रत्येकासाठी बनवायचे आहे. तसेच 31 मे पर्यंत शेतकऱ्यांना व्याजातून सूट देण्यात आली आहे. 25 लाख नवीन शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी आजच दोनच घोषणा असल्या तरीही पुढेही त्यांच्यासाठी घोषणा असणार आहेत.