अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्दच, एटीकेटीबाबत दोन दिवसात निर्णय : शिक्षणमंत्री उदय सामंत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या डिजस्टर मॅनेजमेंट समितीची बैठक पार पडली. यात कोविड 19 आणि गेल्या काही दिवासांपासून प्रलंबित असलेल्या अंतिम वर्षातील परीक्षांबद्दलच्या विषयावर आज पुन्हा चर्चा झाली. यात अव्यवसायिक अभ्यासक्रम, व्यवसायिक अभ्यासक्रम आणि एटीकेटी असे तीन टप्यात निर्णय घेतले आहे. आतापर्यत उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा होणार नसल्याची घोषणा उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. तर एटीकेटी संदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola