#FinalYearExam लॉग इनमध्ये अडचणी, तर कुठे सर्व्हर डाऊन, ऑनलाईन यंत्रणा कुचकामी का ठरतेय?

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेदरम्यान आयडॉलच्या दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्याचा गोंधळ पाहायला मिळाला. आज सुद्धा मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या परीक्षेत अनेक  विद्यार्थ्याना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहावं लागणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना लिंक मिळाली मात्र, लॉग इन होत नसल्याने परीक्षा देता येत नाहीये. हेल्पलाइन क्रमांकावर सुद्धा कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थी पुन्हा एकदा संभ्रमात  आहेत. तांत्रिक कारण दुरुस्त करण्याचं काम विद्यापीठकडून सुरू, आजच परीक्षा घेऊ विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा व चिंता करू नये असे विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola