Sushant Singh Rajput Suicide | या सहा महिन्यात मी तुला संपर्क करायला हवा होता - दिग्दर्शक शेखर कपूर

Continues below advertisement
मुंबई : सुशांत सिंह राजपूतने काल आपल्या मुंबईतील घरात गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील प्रस्थापितांविरोधात अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कंगना रानौतने सुशांतच्या मृत्यूबाबत प्रतिक्रिया देताना बॉलिवूडवर निशाणा साधाला आहे. सुशांतने आत्महत्या केली नाही तर त्याचा खून झालाय असा गंभीर आरोप कंगनाने बॉलिवूडवर केला आहे. काही जण सुशांत कमकुवत असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ज्या व्यक्तीने स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्कॉलरशीप घेतली आहे. इंजिनिअरिंगमध्ये रॅन्क होल्डर आहे, तो मानसिकदृष्ट्या कमकुवत कसा असू शकतो? आत्महत्येआधी सुशांतची जी परिस्थिती होती, त्यासाठी बॉलिवूड जबाबदार आहे. सुशांतवर बोट दाखवणाऱ्या सर्वांचाच कंगनाने चांगलाच समाचार घेतला आहे. यानंतर अनेक दिग्रदर्शक आणि बॉलवूडच्या दिग्गज मंडळींनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram